घात - अपघात

घात - अपघात
Published on: 
घात- अपघात निहालनगरला युवतीची आत्महत्या मालेगाव ः निहालनगर भागातील तय्यबा बानो जिलानी शहा (वय १७) हिने तिची तब्बेत बरी नसल्याने किंवा नैराश्‍यातून राहत्या घरात वरच्या माळ्यावर दरवाजाच्या लोखंडी रॉडला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. आई-वडिलांनी तिला प्रथम खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. नंतर तेथून सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. फैजी यांनी तपासून मृत घोषित केले. २७ ऑक्टोबरला पहाटे साडेचारला हा प्रकार घडला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. ----- आंबेडकर नगरात तरुणीची आत्महत्या मालेगाव ः कॅम्प भागातील आंबेडकर नगरातील अंजली संदीप बैसाणे (वय २२) हिने २७ ऑक्टोबरला दुपारी एकला राहत्या घरी गळफास घेतला. काका राहुल पवार यांनी तिला येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉ. कांतिलाल सुराणा यांनी तपासून तिला मृत घोषित केले. पुढील कारवाईसाठी तिला येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. आशिष यांनी तपासून मृत घोषित केले. कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. ----- जुन्या वादातून तरुणावर हल्ला येथील मुशावरत चौकात आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या कार्यालयाच्या बाजूला तरुणावर चाकूसारख्या हत्याराने वार करुन ठार करण्याचा प्रयत्न केला. शेख सईद शेख वजीर (वय ५५, रा. सना मेडिकल जवळ, आयशानगर) यांच्या मुलावर शेख शहजाद सईद हसन उर्फ डुग्गी (२४), शेख कलीम उर्फ कलोया (दोघे. रा. जाफरनगर) व एक काळसर शर्ट घातलेला (नाव माहीत नाही) यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून चाकूसारख्या हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. २७ ऑक्टोबरला रात्री एकला हा प्रकार घडला. शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला. ------ आयुब नगरात तरुणाला मारहाण येथील अशपाक अहमद वकील अहमद (वय २८, रा. आयुबनगर) यांनी आब्दुल बारी माजीद (रा. मोतीतालाब) याला १२ हजार रुपये उसनवार दिले होते. आब्दुल बारीने पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात भांडण झाले. आब्दुलने लाकडी दांडका अशपाकच्या डोक्यावर मारुन डोके फोडले. तसेच दोघा अनोळखींनी अशपाकला मारहाण केली. २६ ऑक्टोबरला रात्री दहाला जमजम आईस कारखान्याच्या पाठीमागे लुक कारखान्यासमोर हा प्रकार घडला. आयशानगर पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com