mobile theft
sakal
नाशिक
Crime News : मालेगावात २७ लाखांच्या मोबाईलसह तिघांना बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
Police crack mobile theft racket operating across Nashik district : सटाणा शहरातून काही दिवसांपूर्वी मोबाईल चोरीची घटना घडली होती. यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांना माहिती मिळाली की, दोघे भामटे मालेगाव येथून नाशिक येथे जात आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
मालेगाव: कसमादेतून मोबाईल चोरीचे प्रकार सातत्याने घडत होते. येथील सटाणा शहरातून काही दिवसांपूर्वी मोबाईल चोरीची घटना घडली होती. यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांना माहिती मिळाली की, दोघे भामटे मालेगाव येथून नाशिक येथे जात आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. दोघांनी नाशिक, सटाणा व इतर ठिकाणाहून २७ लाखाचे मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली.
