मालेगावात डी.के चौक ते कॉलेज स्टाफ रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी

मालेगावात डी.के चौक ते कॉलेज स्टाफ रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी
Published on: 
पान तीन मेन --------------------- 16148, 16149 मालेगाव कॅम्प : मालेगाव डी.के चौक ते कॉलेज स्टाफ रस्त्यावर एलव्हीएच स्कूल समोरील परिसर. दुसऱ्या छायाचित्रात कॉलेज ते रावळगाव नाका रस्त्यावर अर्धवट उखडलेले रबरी गतिरोधक व उघडे खिळे. मालेगावात गतिरोधकांची मागणी; अपघातांचा धोका वाढला खिळ्यांमुळे वाहने पंक्चर, पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी सकाळ वृत्तसेवा मालेगाव कॅम्प, ता. २३ : येथील डी. के. चौक ते कॉलेज स्टॉप रस्त्यावर ''एलव्हीएच'' स्कूलच्या प्रवेशद्वाराजवळ प्रयास हॉस्पिटलसमोर दोन्ही बाजूंनी गतिरोधक बसविण्याची जोरदार मागणी होत आहे. सदर रस्त्याचे काम पूर्ण झाले असून मध्ये दुभाजक उभारण्यात आले आहेत. मात्र, परिसरातील माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयातील काही तरुण सुसाट वेगाने वाहने चालवत असल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यावर आवश्यक तेथे तातडीने गतिरोधक बसविण्याची गरज निर्माण झाली आहे. या रस्त्यावर बेफान वाहने चालविल्यामुळे यापूर्वी वर्षा चव्हाण व मिसबा नसरूद्दीन या शिक्षिका अपघातात जखमी झाल्या होत्या. याच रस्त्यावर रविवारी भाजीपाला बाजार भरत असल्याने नागरिकांची मोठी गर्दी असते. शेकडो वाहनांसह शालेय विद्यार्थ्यांची या मार्गावर दिवसभर वर्दळ असते. अनेक विद्यार्थ्यांना विशेषतः सकाळी व सायंकाळी जीव मुठीत धरून रस्ता ओलांडताना कसरत करावी लागते. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसवून रस्ता सुरक्षेचे फलक लावण्याची मागणी स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांनी केली आहे. ------- उखडलेल्या गतिरोधकांमुळे खिळे आले बाहेर शहरात एकीकडे नवीन गतिरोधकांची मागणी होत असताना, दुसरीकडे आधी बसविलेले काळे-पिवळे रबरी गतिरोधक अर्धवट उखडले आहेत. यामुळे रस्त्यावर लावलेले खिळे उघडे पडले आहेत. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या टायरमध्ये हे खिळे घुसून वाहने पंक्चर होण्यासह लहान-मोठे अपघात घडत आहेत. ''एलव्हीएच'' स्कूल ते रावळगाव नाका तसेच चर्च परिसरात रबरी गतिरोधक उखडलेल्या अवस्थेत आहेत. महापालिका प्रशासनाने यांची दुरुस्ती करून आवश्यक तेथे नवीन गतिरोधक बसवावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ----------- गतिरोधकांच्या संख्येचा समतोल साधावा शहरातील मोतीबाग नाका ते वर्धमान शाळेपर्यंत ३०० ते ४०० मीटर अंतरावर तब्बल ६ रबरी गतिरोधक बसविले आहेत. तसेच वर्धमान शाळा ते रामसेतू पुलापर्यंत ४ गतिरोधक आहेत. सोयगाव मराठी शाळा ते डी. के. चौकापर्यंत १० डांबरी गतिरोधक असून, डी. के. चौक ते चर्च गेटदरम्यान ९ डांबरी गतिरोधक आहेत. त्यातील अर्धे गतिरोधक निघून गेले आहेत. प्रशासनाने सर्वत्र गतिरोधकांच्या संख्येचा योग्य समतोल साधावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सदर रस्त्यावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महाविद्यालयीन तरुण बुलेट व रेसर गाड्या अतिशय जोरात चालवतात. शालेय विद्यार्थ्यांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी या रस्त्यावर गतिरोधक बसवणे अत्यंत गरजेचे आहे. बाळासाहेब देवरे, स्थानिक नागरिक, मालेगाव कॅम्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com