मालेगाव- राज्य सरकारने एसटी बसमध्ये भाडेवाढ केल्यापासून एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. एसटी बसमध्ये विविध सवलती मिळत असल्याने महिलांसह ज्येष्ठांचा ओढा एसटी बसकडे आहे. शासनाने २६ जानेवारीपासून १४.९७ टक्के भाडेवाढ केली. भाडेवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसली असून मात्र एसटीच्या मालेगाव आगाराला उत्पन्नात महिनाभरात ६७ लाखाची वाढ झाली आहे. यात सवलत व विना सवलत यातून मिळालेली वाढ आहे.