

Malegaon sugar factory crushing season success
sakal
कल्याण पाचांगणे
माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी, असा गळीत हंगाम यंदा चालू आहे. या कारखान्याचे दिवंगत चेअरमन व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आजवर सुमारे आठ लाख टन उसाचे क्रशिंग यशस्वीरीत्या पूर्ण झाले. वेळेत आणि शिस्तबद्ध गाळपामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा प्राप्त स्थितीतच विमान अपघातामध्ये या कारखान्याचे चेअरमन अजित पवार यांचे निधन झाले. परिणामी माळेगावचे प्रशासन व सभासद पूर्णतः पोरके झाले.