
माळेगाव : १ ते १५ मार्च`च्या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे पमेंट माळेगाव कारखाना प्रशासनाने प्रतिटन ३१३२ रुपये एकरकमी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग केले. ३१३२ ही रक्कम एफआरपी (एकरकमी रास्त व किफायतशीर दर) पेक्षा अधिकची आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून एफआरपी एकरकमी देण्याबाबतचा केलेला आदेश महाराष्ट्रात सर्वप्रथम माळेगावने स्वीकारला. परिणामी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार नेतृत्व करीत असलेल्या माळेगावच्या संचालक मंडळाचे अभिनंदन केल्याचे सांगण्यात आले.