घात - अपघात

घात - अपघात
Published on: 
घात-अपघात मथुरपाडे येथे एकाची आत्महत्या मालेगाव ः मथुरपाडे (ता. मालेगाव) येथील प्रभाकर वाल्मीक नवले (वय ४५) यांनी राहत्या घरी घराच्या छताच्या अँगलला वायरिंगच्या सहाय्याने गळफास घेतला. भाऊ रवींद्र नवले यांनी त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉ. सौद यांनी त्यांना मृत घोषित केले. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. ----- महिलेचा मृत्यू जळगाव (ता. मालेगाव) येथील सुपाबाई प्रल्हाद संसारे (वय ३३) यांनी ५ सप्टेंबरला पहाटे अडीचच्या सुमारास फवारणीचे औषध प्राशन केले. ११ सप्टेंबरला सायंकाळी पाचला उपचार सुरू असताना १३ सप्टेंबरला डॉ. कडलक यांनी तपासून मृत घोषित केले. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. ----- तरुणाची आत्महत्या कुकाणे (ता. मालेगाव) येथील भय्यासाहेब दगाजी पगारे (वय ४०) याने राहत्या घरी गळफास घेतला. मावसभाऊ दीपक बोरसे याने येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. फैजी यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. १ ऑक्टोबरला सकाळी साडेसहाला हा प्रकार घडला. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. ------ सोन्याचे कडे लंपास येथील कॉलेज स्टॉप भागातील किशोर विठ्ठल नेरकर यांच्या घरातील कपाटातून चोरट्यांनी दोन लाखांचे सोन्याचे कडे लांबविले. २९ सप्टेंबरला दुपारी दीड ते सायंकाळी चारच्या दरम्यान हा प्रकार घडला. कॅम्प पोलिस ठाण्यात ४० वर्षीय गवळी नावाच्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com