वीजेच्या धक्क्याने
तरुणाचा मृत्यू
मालेगाव : येथील रजियाबाद भागातील मोहम्मद अश्पाक मोहम्मद रियाज (वय २७) या तरुणाला राहत्या घरी वीजेचा धक्का लागल्याने तो घरावरुन खाली पडला. डोक्यास गंभीर मार लागल्याने मामा मोहम्मद हुसेन अब्दुल खालीद यांनी त्याला येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. अमरीन यांनी तपासून मयत घाेषित केले. १० नोव्हेंबरला रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. द्याने रमजानपुरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे.
------
प्रसूती दरम्यान
महिलेचा मृत्यू
मालेगाव : येथील शाहीना बानो मेहबूब आलम (वय ३६, रा. अली अकबर हॉस्पीटलजवळ) या महिलेची २४ ऑक्टोबरला रात्री आठच्या सुमारास येथील इन्सिया हॉस्पीटलमध्ये प्रसुती झाली. प्रकृती खराब झाल्याने तिला तिच्या पतीने रात्री सव्वानऊला सहारा हॉस्पीटल येथे दाखल केले. प्रकृती अधिक खराब झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने २५ ऑक्टोबरला रात्री दहाला धुळे येथील हिरे कॉलेजमध्ये दाखल केले. २९ ऑक्टोबरला सकाळी साडेआठला उपचार सुरु असतांना डॉ. जगदीश चौरे यांनी तपासून तिला मयत घोषित केले. आझादनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे.
-----
मालेगावला भामट्यांनी
मोबाईल ओरबडला
मालेगाव : धुळे येथील खय्याम शफिक अन्सारी (वय ६१, रा. चाळीसगाव रोड) यांचा २८ हजाराचा मोबाईल युनिकॉर्न दुचाकीवरुन (एमएच १८ सीए ४७९४) आलेल्या तिघा भामट्यांनी बळजबरीने हिसकावून पोबारा केला. दरेगाव बारी येथे ९ नारेव्हेंबरला रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. पवारवाडी पोलिस ठाण्यात तिघा चोरट्यांविरुध्द (नाव, गाव माहित नाही) गुन्हा दाखल झाला आहे.
-----
महिलेची सोन्याची
पोत पळवली
मालेगाव : दसाणे शिवारातील दसाणे फाटा ते दसाणे रस्त्यावरील हड्डी कारखान्यासमोर महिलेची सव्वा लाखाची सोन्याची पोत हिसकावून नेण्याचा प्रकार घडला. निता चंद्रकांत पाटील (वय ३२, रा. येसगाव बुद्रुक) यांची १ लाख २० हजाराची सोन्याची पोत विना क्रमांकाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोघा अनोळखी भामट्यांनी हिसकावून नेली. बुधवारी (ता. ११) दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
------
कारच्या धडकेत
दुचाकीस्वार ठार
मालेगाव : मुंबई आग्रा रस्त्यावरील सवंदगाव फाट्याजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एक जण जखमी झाला. नाशिकहून धुळ्याकडे जाणाऱ्या मारुती सुझुकी वॅगनर कारने (एमएच ४६ पी ०७५३) पुढे चालणाऱ्या दुचाकीला (एमएच ४१ क्यु ९८८५) जबर धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार शेख शब्बीर शेख मुनाफ (वय ३९, रा. खडकी रोड, द्याने) गंभीर जखमी होवून ठार झाला. तर पाठीमागे बसलेला मुनव्वर खान मनसूर खान (रा. मालेगाव) गंभीर जखमी झाले आहेत. ९ नोव्हेंबरला सकाळी पाऊणेनऊच्या सुमारास अपघात झाला. पवारवाडी पोलिस ठाण्यात कारचालकाविरुध्द (नाव, गाव माहित नाही) गुन्हा दाखल झाला आहे.
------
बेशुध्द तरुणाचा
मालेगावला मृत्यू
मालेगाव : येथील देवीचा मळा भागातील जिभाऊ बाळू अहिरे (वय ५५) हे १० नोव्हेंबरला दुपारी साडेबाराला एकात्मता चौकातील इदगाह मैदान येथे बेशुध्द अवस्थेत मिळून आले. नातेवाईक योगेश वाघ यांनी त्यांना येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. फैजी यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे.