Dada Bhuse
sakal
मालेगाव: संवदगाव (ता. मालेगाव) परिसरात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाची शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी रविवारी (ता. २२) पाहणी केली. या नुकसानाचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करावा, असे निर्देश शिक्षणमंत्री भुसे यांनी प्रशासनाला दिले. जिल्ह्यासह बागलाण, देवळा व मालेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.