गळफास घेऊन
तरुणाची आत्महत्या
मालेगाव : सौंदाणे (ता. मालेगाव) येथील जगदिश बाळासाहेब टाक (वय ४५) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. भाऊ निलेश टाक याने त्याला येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. साद यांनी तपासून त्याला मृत घाेषित केले. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
-----
खुद्दारनगर भागात
तरुणाला मारहाण
मालेगाव : येथील खुद्दारनगर भागातील शेख शोएब शेख मुक्तार (वय २२) व त्याचा मामा मुश्ताक शेख यांना मागील भांडणाची कुरापत काढून इमरान उर्फ अम्मू, अकबर शहा अरमान शहा, समीर शहा आरमान शहा, वसीम येडा (सर्व रा. मालेगाव) यांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. अकबर शहा याने धारदार वस्तुने उजव्या खांद्यावर मारुन दुखापत केली. आमच्या नादी लागले तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही असा दम दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ७ नोव्हेंबरला सायंकाळी सहाला सलीमनगर सार्वजनिक शौचालयाजवळ हा प्रकार घडला. शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
------
दुचाकीच्या अपघातात
दहिवाळला तिघे जखमी
मालेगाव : चाळीसगाव रस्त्यावरील दहिवाळ शिवारातील शनी मंदिर ते रंगत हॉटेल दरम्यान दोन दुकींच्या अपघातात तिघे जण जखमी झाले. आसिफ शहा शफिक शहा (रा. चुनाभट्टी) हा दुचाकीने (एमएच ४१ बीटी ४१११) चाळीसगावहून मालेगावकडे व निलेश नारायण पवार (रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) हा त्याच्या दुचाकीने (एमएच १९ ईएल १०६६) मालेगावहून चाळीसगावकडे जात असतांना दोघांच्या दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. अपघातात आसिफ शहा शफिक शहा, निलेश पवार व आतिक अहमद रसुल खान (रा. चुनाभट्टी) हे तिघे जखमी झाले. ६ नोव्हेंबला दुपारी साडेबाराला हा अपघात झाला. तालुका पोलिस ठाण्यात दोघा दुचाकीस्वारांविरुध्द अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
------
मुंगसे शिवारात
अपघातात एक जखमी
मालेगाव : मुंगसे (ता. मालेगाव) शिवारात दुभाजकावर कारने दुचाकीला धडक दिल्याने एक जण जखमी झाला. व्हींटो कारचालक (एमएच ०२ बीआर २०६५) नाशिकहून मालेगावकडे भरधाव येत असतांना मामा भांजे हॉटेलसमोरील दुभाजकावर समोर चालणाऱ्या बजाज प्लॅटिना दुचाकीला (एमएच ४१ एल ८८५३) धडक दिली. अपघातात नाना राजाराम केदारे (वय ५२) यांच्या डोक्याला, चेहऱ्याला, तोंडाला, डाव्या पायाला मार लागून गंभीर जखमी झाले. तसेच दुचाकीचे नुकसान झाले. ५ नोव्हेंबरला रात्री नऊला अपघात झाला. महेंद्र नाना केदारे (वय २५, रा. सोयगाव, मालेगाव) यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलिस ठाण्यात कारचालकाविरुध्द (नाव, गाव माहित नाही) गुन्हा दाखल झाला आहे.