मालेगाव: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यामधील घोळ बाहेर काढला. निवडणूक आयोगाने या संदर्भात आधार कार्डला मतदान कार्ड बायोमेट्रीक पद्धतीने लिंक करावे. असे केल्यास दुबार, तिबार असा घोळ संपुष्टात येईल अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदार विशाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.