दोन वेगवेगळ्या
अपघातात दोन ठार
मालेगाव ः तालुक्यातील मनमाड रस्त्यावरील चोंढी घाट व महामार्गावरील लोणवाडे फाटा या दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघे तरुण ठार झाले. मालेगाव मनमाड रस्त्यावरील चोंढीजवळील वळण रस्त्यावर बसने (एमएच १४ एमएच ६६४७) दुचाकीला (एमएच १५ डीटी ७३४९) जबर धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार कैलास खंडू गागरे (३८, रा. एरंडगाव) हा तरुण गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाला. त्याचा मित्र ज्ञानेश्वर विठ्ठल देवरे जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवनाथ गागरे यांच्या तक्रारीवरून बसचालक सचिन सुरेश सुर्वे (रा. घोट, जि. सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. महामार्गावरील लोणवाडे फाट्यावर दुसरा अपघात झाला. व्हेंजर दुचाकीने (एमएच ०४ एचजी ८४१६) दुचाकीला (एमएच ४१ बीसी ८०३६) जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार मोहम्मद इरशाद मोहम्मद सईद (३४, रा. संजरीनगर) हा डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाला. तर पाठीमागे बसलेला अल्ताफ रियाज अहमद अन्सारी (३४, रा. फार्मसीनगर) हा गंभीर जखमी झाला. अल्ताफ अन्सारी यांच्या तक्रारीवरून धडक देणाऱ्या व्हेंजर दुचाकीस्वाराविरुद्ध (नाव, गाव माहित नाही) तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.