सौंदाणेत तरूणाची
गळफास घेत आत्महत्या
मालेगाव : सौंदाणे (ता. मालेगाव) येथील शंकर मुरलीधर वाघ (वय २२) या तरुणाने राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. त्यास दगडू साेनवणे यांनी त्याला येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. नीलेश यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. गुरुवारी (ता. १२) सायंकाळी साडेसातला हा प्रकार घडला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
------
चिखलओहोळ
शिवारातून बॅटऱ्या लंपास
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील चिखलओहोळ शिवारातील रिलायन्स पेट्रोलपंपाच्या मागे असलेल्या एअरटेल जिओ, बीएसएनएलच्या २४ हजार रुपये किंमतीच्या २४ बॅटऱ्या चोरट्य़ांनी लंपास केल्या. ११ नोव्हेंबरला रात्री दोन ते तीनच्या दरम्यान हा प्रकार घडला. कंपनीचे फिल्ड ऑफिसर गंगाधर चौधरी (वय ५०, रा. वडाळीभोई, ता. चांदवड) यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
------
झोडगेत महिलेचे
मंगळसूत्र हिसकावले
मालेगाव : झोडगे (ता. मालेगाव) येथील शोभा प्रकाश सोनजे (वय ५९) यांची सोन्याची पोत चोरट्य़ांनी चोरुन नेली. विना क्रमांकांच्या दुचाकीवरुन आलेल्या दोघा भामट्यांनी बळजबरीने पोत हिसकावून नेली. १२ नोव्हेंबरला पहाटे साडेपाचला मराठी शाळेजवळील वाणी गल्लीत हा प्रकार घडला.