मालेगाव- रमजान पर्वाला २ मार्चपासून सुरुवात झाली आहे. येथील फळ बाजारपेठेला झळाळी आली आहे. रोज हजारो टन टरबूज, खरबूज, केळी विकली जात आहेत. २५ दिवस हीच परिस्थिती असणार आहे. .गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरबूज, चिकूचे दर किलोमागे दुपटीने वाढले आहेत. येथे रमजाननिमित्त आयशानगरात, नुरबाग, शिकारी चौक, मुमताज, पंजतन, सरदार बाजार, मच्छीबाजार, एकबाल डाबी, मुस्तफा चौक, ईद्दू मुकादम चौक, रौनकाबाद, डेपो, आझादनगर, सलामताबाद यासह अनेक भागात विशेष फळांचा बाजार भरत आहे. या बाजारांमध्ये केळी, टरबूज, खरबूज यांची रेलचेल आहे..यंदा चिकू, द्राक्षे यांनी शंभरी ओलांडली आहे. येथे महिनाभर फळांना मागणी असते. त्यामुळे अनेक व्यापारी शहरात गोडाऊनमध्ये टरबूज, खरबूज भरतात. यंदा कसमादे परिसरात टरबूज, खरबुजाची लागवड कमी झाली आहे. दोन वर्षापूर्वी अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघाला नाही. शेतकऱ्यांनी खरबूज, टरबूज लागवडीकडे पाठ फिरवली आहे. शहरात यंदा कमी दर्जाचे फळ विक्रीला येत आहेत. केळीचे दरही यंदा वाढले आहेत. फळफळावळ बाजारात चोपडा, अमळनेर, धुळे या भागातून टरबूज २० टन, तर खरबूज १३ टन येत आहे. तसेच चिकूचे कोपरगाव, शिर्डी या भागातून ७०० ते ८०० कॅरेट तर द्राक्ष ४०० कॅरेट विक्रीला येतात..तात्पुरता रोजगार रमजानपर्वात अनेक भाजीपाला विक्रेते फळ विक्रीचा व्यवसाय करतात. शहरात ठिकठिकाणी फळ विक्रीच्या हातगाड्या लागतात. येथे दीड हजार पेक्षा अधिक हातगाड्यांवर फळांची, समोसा, कचोरी यासह विविध खाद्यपदार्थांची दुकाने लागली आहेत. रमजानपर्वात हजारो नागरीकांना तात्पुरत्या स्वरूपात मिळत असल्याचे केळी विक्रेते अफरोज बागवान यांनी सांगितले..रमजानमध्ये फळांना मागणी असते. त्यामुळे येथे फळांची आवक महिनाभर टिकून राहते. येथे टरबूज, खरबूज जळगाव, धुळे या भागातून येतो. -श्याम मालपुरे, भगवा महाराष्ट्र फ्रूट कंपनी, मालेगाव.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.