मालेगाव महानगरपालिका स्विकृत सदस्य निवडीसाठी पक्ष संख्याबळ निश्‍चित

मालेगाव महानगरपालिका स्विकृत सदस्य निवडीसाठी पक्ष संख्याबळ निश्‍चित
Published on: 
मेन फिचर मालेगाव स्विकृत सदस्यांचे संख्याबळ निश्‍चित ------------------------------------------------ महापालिकेत सदस्य निवडीसाठी पक्ष राजकिय हालचाली गतीमान सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. २६ : येथील महापालिकेत स्विकृत नगरसेवक नियुक्त करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर तयारी सुरु झाली आहे. स्विकृत सदस्यांची नियुक्ती संदर्भात नियम व पक्षाचे संख्याबळ या संदर्भात महापौर नसरीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांची बैठक झाली. बैठकीत गटनेत्यांना माहिती देण्यात आली. ८४ सदस्यीय सभागृहात आठ स्विकृत नगरसेवक असणार आहेत. यात इस्लाम पक्षाचे तीन, एमआयएम व शिवसेनेचे प्रत्येकी दोन तर समाजवादी पक्षाचा एक स्विकृत सदस्य निवडला जाणार आहे. दरम्यान स्विकृत सदस्य निवड नेमकी कधी होते याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. येथील महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२६ ला झाली. इस्लाम पक्षाने सर्वाधिक ३५ जागा जिंकल्या. एमआयएमने २१ तर शिवसेनेने १८ जागांवर विजय मिळविला. समाजवादी पक्षाचे ५, कॉंग्रेसचे ३ व भाजपचे २ नगरसेवक निवडून आले आहेत. सार्वत्रिक निवडणूक होवून नऊ महिने उलटले तरी देखील स्विकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. येथे अनेकांनी स्विकृत नगरसेवक पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. महापौर नसरीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहात महत्वपुर्ण बैठक झाली. गटनेत्यांना स्विकृत सदस्य नियम व पक्षाचे संख्याबळ सांगण्यात आले. ८४ सदस्यांमधून ८ स्विकृत नगरसेवक निवडले जाणार असल्याने त्यांचा सहगुणक १०.५ आहे. निवडून आलेल्या सदस्यांच्या संख्येनुसार स्विकृत नगरसेवक संख्याबळ निश्‍चित करण्यात आले. इस्लाम पक्षाचे तीन, एमआयएम व शिवसेनेचे प्रत्येकी दोन तर समाजवादी पक्षाचा एक स्विकृत नगरसेवक असणार आहे. स्विकृत नगरसेवक सदस्यांच्या पात्रतेचे निकष गटनेत्यांना सांगण्यात आले. बैठकीला उपमहापौर शानेहिंद निहाल अहमद, विरोधी पक्ष नेता निलेश काकडे, इस्लाम पक्षाचे गटनेते मोहम्मद खालीद, एमआयएमचे गटनेते अब्दुल मलिक, शिवसेनेचे गटनेते निलेश आहेर, समाजवादी पार्टीचे गटनेचे मुस्तकीम डिग्निटी, कॉंग्रेसचे गटनेचे एजाज बेग, भाजपचे गटनेते मदन गायकवाड उपस्थित होते. बैठकीला आयुक्त रवींद्र जाधव व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे हजर होते. उपायुक्त सुनिता कुमावत, नगरसचिव साजीद अहमद, जनसंपर्क अधिकारी पंकज साेनवणे, लघुलेखक प्रणव जोशी आदि उपस्थित होते. चौकट पक्ष बलाबल निवडायची संख्या महापालिका ८४ ८ इस्लाम पक्ष ३५ ३ एमआयएम २१ २ शिवसेना १८ २ समाजवादी पक्ष ०५ १
Marathi News Esakal
www.esakal.com