Police Conduct Raid
sakal
मालेगाव: शहरातील बेलबाग भागात नीलगायीचे मांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली. मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात तीसवर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून, दोन संशयित फरारी झाले आहेत. तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.