चारचाकी वाहनासह तीन लाखाचा गुटखा जप्त

चारचाकी वाहनासह तीन लाखाचा गुटखा जप्त
Published on: 
फोटो - 16047 मालेगाव : गुटख्यासह जप्त केलेली कार. --- चारचाकी वाहनासह तीन लाखांचा गुटखा जप्त सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. ५ : शहरात चोरट्या पद्धतीने गुटखा येत असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या पथकाला मिळाली. पथकाने तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी सापळा रचून कारला ताब्यात घेतले. कारमधून (एमएच ०२, बीझेड, ४४७९) पोलिसांनी वाहनासह सुमारे तीन लाखांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील सायने बुद्रुक शिवारातील चाळीसगाव फाटा येथे सापळा रचून पोलिसांनी वाहनासह तीन लाखांचा गुटखा जप्त केला. येथील दरेगाव भागातील शहा मोहम्मद अकबर अली (वय २६), दोस्त मोहम्मद अकबर अली (वय २८, रा. दरेगाव) या दोन सख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी गुटखा कुठून आणला याचा तपास पोलिसांतर्फे केला जात आहे. पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून पांढऱ्या चारचाकी वाहनातून दोन लाख ४९ हजार ८० रुपयांचा गुटखा व ६० हजाराची कार, असा तीन लाख नऊ हजार ८० रुपयांचा ऐवज जप्त केला. अन्न सुरक्षा अधिकारी चेतन परदेशी यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com