पान-२ मेन कऱणे
KLW26B09914 KLW26B09915
कळवण ः राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या मळगाव येथील पावरी नृत्य कलापथकाचा सत्कार करताना जयश्री पवार व साहाय्यक प्रकल्पधिकारी नितांत कांबळे. दुसऱ्या छायाचित्रात राज्यस्तरीय पोस्टर डिझाईन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारे कलाशिक्षक सुरेश भास्कर पवार.
------------
कळवणच्या कलाकारांचा राज्यस्तरावर डंका
पावरी नृत्य, पोस्टर डिझाईनमध्ये प्रथम क्रमांक; जयश्री पवार यांच्या हस्ते कलाकारांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
कळवण, ता.१९ ः जनजातीय गौरव सेवा सप्ताहाच्या समारोपप्रसंगी कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील कलाकारांनी राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या यशाचा गौरव करण्यात आला. गडचिरोली येथे झालेल्या ‘बिरसा मुंडा कला संगम २.०’ स्पर्धेत पावरी नृत्य आणि पोस्टर डिझाईन या दोन्ही प्रकारांत कळवण प्रकल्पाच्या कलाकारांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे कळवणच्या आदिवासी कला-संस्कृतीचा नावलौकिक राज्यभर पोहोचला आहे.
-------------
क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जनजाती गौरव दिनानिमित्त ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान विविध उपक्रम राबविण्यात आले. सप्ताहाच्या समारोपप्रसंगी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदिवासी कलाकारांना गौरविण्यात आले. गडचिरोली येथील राज्यस्तरीय स्पर्धेत पोस्टर डिझाईन प्रकारात सुरेश भास्कर पवार (कलाशिक्षक, कन्या आश्रमशाळा, माणी, ता. सुरगाणा) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. वाद्यवादन (पावरी नृत्य) स्पर्धेत मळगाव येथील सोमनाथ काळू पवार, राजेंद्र शिवाजी महाले व पंडित लक्ष्मण राऊत यांच्या कलापथकाने पारंपरिक पावरी नृत्याचे सादरीकरण करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
आमदार नितीन पवार यांच्यातर्फे त्यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी कलाकारांचे कौतुक केले. मळगाव येथील पावरी नृत्य कलापथकाला त्यांनी वैयक्तिकरित्या शाल, श्रीफळ व रोख रक्कम देऊन गौरविले. पारंपरिक आदिवासी कला-संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कलाकार घेत असलेले परिश्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. आदिवासी सेवक डी. एम. गायकवाड, रघुनाथ महाजन, राजू पवार,राजू पाटील, अशोक पवार, कमल पवार आदी उपस्थित होते.
---
कोट
आदिवासी समाजाची पारंपरिक कला आणि संस्कृती ही आपली अमूल्य ओळख आहे. राज्यस्तरावर कळवणच्या कलाकारांनी मिळविलेले यश अभिमानास्पद आहे. कलाकारांना प्रोत्साहनासाठी ही समृद्ध लोककला पुढील पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल.
- जयश्री पवार, माजी अध्यक्षा, जिल्हा परिषद, नाशिक
------------
कळवण प्रकल्पातील कलाकारांनी राज्यस्तरीय स्पर्धेत दोन प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवून प्रकल्पाचा गौरव वाढविला आहे. आदिवासींच्या पारंपरिक कला, संस्कृती व लोकपरंपरांचे जतन करण्यासाठी प्रकल्पाच्या माध्यमातून सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे.
- डॉ. कश्मिरा संखे, प्रकल्प अधिकारी तथा साहाय्यक जिल्हाधिकारी
----------------