Chandanpuri Yatra : चंदनपुरीत 'मल्हार' भक्तांचा दाटला पूर; यात्रोत्सवात तेजीचा सूर

Nashik News
Nashik News esakal

मालेगाव (जि. नाशिक) : प्रती जेजुरी असलेल्या श्रीक्षेत्र चंदनपुरीत तीन आठवड्यापासून जोरदार यात्रा भरत आहे. गत दोन वर्षांपासून कोरोनाचा मोठा फटका बसलेला होता. त्यामुळे गेल्या तीस- चाळीस वर्षांपासून परंपरागत यात्रा करणाऱ्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले. (Malhar devotees coming Chandanpuri in huge numbers Professionals happy nashik news)

Nashik News
Nashik News: सायखेडा पोलिसांतर्फे हळदी कुंकू समारंभात दिला सुवासिंनींचा मान; महिल्या भारावल्या

यंदाच्या हंगामात प्रत्येक रविवारी व मंगळवार, शुक्रवारी प्रचंड गर्दी झाल्याने यात्रेतील छोटे मोठे व्यावसायिक यांनी समाधान व्यक्त केले. यात्रेनिमित्त 'मल्हार' भक्तांचा पूर दाटल्याने ग्रामपंचायत यात्रा कमिटीने आठ दिवस वाढविली आहे. त्यामुळे रविवारी (ता.२९) अखेरचा दिवस असेल. यावेळी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतील.

यात्रेतील पदार्थ एकत्र मित्र गोतावळ्यात खाण्याची मजा वेगळीच असते. अलीकडे बदलत्या काळानुसार मात्र गेल्या आठ दहा वर्षांपासून यात्रा फक्त देवदर्शनार्थ राहिल्याचे अनेक व्यावसायिक यांनी बोलून दाखवले. गाव खेड्यात छोट्या मोठ्या वस्तू घरपोच मिळतात.

यात्रेतील जिलेबी भजी गोडी शेव या सर्व मिठाई आठवडे बाजार व गाव बाजारात उपलब्ध होतात. खेळण्यासह, बांगड्या, ज्वेलरी वगैरे सर्व गावा गावात विक्री करतात. यात्रेतील जागेचे भाडे, तंबू, वाहतूक खर्च, कारागिर रोजंदारी, स्वयंपाकी, वेटर यांचा खर्च पाहता यात्रा जेमतेम होत असते.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

Nashik News
Thank God: पॅन्ट शर्टातील श्रीकृष्ण चालतो मग सूटाबुटातील चित्रगृप्त का नाही ?

परंतु परंपरागत यात्रा करणाऱ्या व्यावसायिक सातत्याने वर्षभरात तीन चार मोठ्या यात्रा करतात. यात चंदनपुरी यात्रा महत्त्वाची असल्याचे सांगितले. दरम्यान आठ दिवस यात्रा जास्त काळ भरणार असल्याने कोरोनातील कसर भरण्याचा प्रयत्न होईल.

"दोन वर्षातील खंडानंतर यंदा भक्तांच्या गर्दीने भरून निघाला आहे. खंडेराव महाराजांबद्दल असलेली श्रद्धा व भक्तीमुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. पुढील आठदिवसाचे यात्रा नियोजन केले असून यात्रा उत्सव जोरदार होईल." - विनोद शेलार, सरपंच, चंदनपुरी

"सर्वसाधारणपणे व्यवसाय मध्यम आहे. यात्रेच्या अंतिम टप्प्यात व्यवसाय वाढला आहे. माणसं खूप लागतात, महागाईमुळे कारागीर, वेटर मजुरी वाढली. किराणा माल व तेलाचे भाव वाढले पण मिठाईचा भाव वाढला नाही. हॉटेल व्यवसायात तिसरी पिढी, तीस वर्षांची परंपरा आहे"

- सर्जेराव अहिरे, निमगावकर मिठाई.

"साधने वाढले. वेगवेगळ्या योजना यामुळे व्यवसायावर परिणाम झाला. वडिलांच्या परंपरेमुळे नफा तोटा न पाहता १० वर्षांपासून व्यवसाय करतो आहे." - प्रदीप मस्तूद, चाळीसगाव, इमेटीशन ज्वेलरी स्टॉल.

Nashik News
Nashik Bus Fire : शिर्डीला जाणाऱ्या प्रवासी बसला आग; 18 भाविक करत होते प्रवास

जुन्या जाणत्या महिला यात्रेत हमखास बांगड्या भरतात. नवी पिढीला मात्र शोरुममध्ये जायला आवडते. काळ बदलला आम्हीही बांगडी व्यवसायात बदल केले मात्र पुर्वी सारखा बांगड्या विक्री फार होतं नाही. चंदनपुरी येथे पस्तीस वर्षांपासून यात्रा करतो.

- गफ्फार मणियार, बांगडीवाले, जामनेर

साध्या खेळणी पेक्षा चल व इलेक्ट्रॉनिक खेळणींकडे बच्चे कंपनीचा कल वाढला आहे. मोबाईल युगाचा परिणाम खेळणी व्यवसायावर झाला आहे. समाधानकारक परिस्थिती आहे.

- महेंद्र पगारे, खेळणी व्यावसायिक.

Nashik News
Nashik News: आगीत आदिवासींची घरे खाक; 3 कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com