नाशिक- कमी वयातील बाळंतपण, घरात होणाऱ्या प्रसूती, गरोदर मातांचा अपुरा आहार आणि आरोग्य सुविधांचा अभाव या प्रमुख कारणांमुळे बालके कुपोषणाचे बळी ठरत आहेत. महिला व बालकल्याण विभागाच्या अहवालानुसार नाशिक विभाग राज्यात कुपोषणाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार बालके मध्यम कुपोषित, तर ३५० बालके तीव्र कुपोषित असल्याचे समोर आले आहे. कुपोषण ही समस्या आता केवळ आदिवासी भागापुरतीच मर्यादित राहिलेली नसून, शहरी व निमशहरी भागालाही तिची झळ बसत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.