Malnutrition News : जिल्ह्यात अडीच हजार बालके कुपोषित; 3 महिन्यात 240 बालके कुपोषणमुक्त

Malnutrition
Malnutritionesakal
Updated on

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेने आदिवासी आणि दुर्गम भागातील कुपोषित बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे तीन महिन्यात तब्बल २४० बालके कुपोषणमुक्त झाली आहेत. पावसाळा संपल्यानंतर ऑगस्ट महिन्यात महिला व बालकल्याण आणि आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात ४९३ तीव्र कुपोषित बालके (सॅम) होती. हाच आकडा ऑक्टोबरमध्ये झालेल्या सर्वेक्षणात २५३ वर येऊन पोचला आहे. कुपोषण मुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या एक मूठ पोषण आहार या अभिनव उपक्रमाचा पॅटर्न यशस्वी होत असल्याचे बोलले जात आहे. (Malnutrition News Two half thousand children malnourished in district 240 children free from malnutrition in 3 months Nashik news)

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत ऑक्टोंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणात २ हजार १९० बालके ही मध्यम कुपोषित (मॅम) तर, २५३ बालके ही तीव्र कुपोषित अशा एकूण २ हजार ४४३ बालके कुपोषणाच्या कचाट्यात असल्याचे दिसून आले आहे. कोरोना संकटात कुपोषित बालकांचा प्रश्न गंभीर झाला होता. कुपोषित बालके प्रामुख्याने ग्रामीण भागातील यातही आदिवासी तालुक्यांमधील असल्याने यामध्ये अंगणवाड्या बंद असल्याकारणाने बालकांच्या आहाराचा प्रश्न गंभीर झाला होता.

मात्र, या काळात एकात्मिक बाल विकास सेवा विभागांतर्गत बालकांना घरपोच आहार पुरविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता. यासोबत दर महिन्याला दोन ते तीन वेळा घरभेटी देऊन बालकांचे वजन घेत, आहार मिळतो की नाही याची खातरजमा केली जात होती. यात काळात जिल्हा परिषदेने एक मूठ पोषण आहार योजना ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबविल्या कुपोषणात घट झाली. कोरोना संकट कमी झाल्यानंतर हा पॅटर्न जिल्ह्यात सुरूच ठेवला. परिणामी कुपोषित बालकांचे प्रमाण घटत असल्याचे दिसून आले.

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

Malnutrition
Nashik News : गायत्रीच्या बहिणीची आमदार रोहित पवारांनी स्वीकारली शैक्षणिक जबाबदारी

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण व आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे वजन घेऊन कुपोषणाबाबतचे सर्वेक्षण केले जाते. ऑक्टोंबर महिन्यात ० ते ६ या वयोगटातील असलेल्या ३ लाख ३८ हजार ९६५ बालकांपैकी ३ लाख २८ हजार ९३३ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील २४ हजार ९५२ बालके मध्यम कमी वजनाची आढळली. तर, ६ हजार ७६४ बालके ही तीव्र कमी वजनाची आढळली. यातील २ हजार १९० ही मध्यम गंभीर कुपोषित तर, २५३ बालके ही तीव्र गंभीर कुपोषित सापडली.

...असा आहे नाशिकचा पॅटर्न

कुपोषण मुक्तीच्या पॅटर्नमध्ये नाशिक जिल्हा परिषदेकडून घरोघरी जाऊन बालकांना नियमित गरम, ताजा पोषण आहार व अमृत आहार तसेच पोषण कल्पवडी व मायक्रोन्यूट्रियंट हा अतिरिक्त आहार वाटप करत आहे. ग्रामपंचायत वर गावातील कुपोषित बालकांची जबाबदारी सोपवून एक मूठ पोषण आहार हा अभिनय योजना राबवण्यात येत आहे.

प्रकल्पनिहाय कुपोषित बालके

प्रकल्प मध्यम गंभीर कुपोषित बालके तीव्र गंभीर कुपोषित बालके
पेठ ९० २१
हरसुल १४४ २२
सुरगाणा ८० ०६
बा-हे ६१ ०७
इगतपुरी १८० २४
दिंडोरी ९५ १०
उमराळे ६४ १२
कळवण-१ ८८ ०१
कळवण-२ ४८ ०६
नाशिक २२२
१३
त्र्यंबकेश्वर १०१ ११
देवळा ७६ ०५
बागलाण ५६ १६
बागलाण-१ ६९ ०८
सिन्नर-१ ८४ ०४
सिन्नर-२ ७२ ०४
निफाड १३० ०७
मनमाड १६५ २६
पिंपळगाव ९८ ०८
येवला-१ १७ -
येवला-२ २८ -
नांदगाव ३९ ०२
चांदवड-१ ३३ ०८
चांदवड-२ ६५ ०६
मालेगाव ४४ १७
रावळगाव ४१ ०९

Malnutrition
Measles Disease : नाशिक जिल्ह्यात गोवरसाठीही आता विलगीकरण कक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com