
मालेगाव (जि. नाशिक) : शहराची मुख्य अर्थवाहिनी व सहकारात जिल्ह्यात अग्रणी असलेल्या मालेगाव मर्चन्टस् को ऑप बँकेची (मामको) निवडणूक स्थापनेच्या तब्बल सहा दशकानंतर बिनविरोध पार पडली. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सहकार मोडकळीस आला असताना मालेगावकरांनी बिनविरोध निवडणूक करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी व इच्छुकांनी दाखविलेले औदार्य वाखाणण्याजोगे आहे. मुळातच शहरात नेतृत्वाला कमी संधी असल्याने मामको बँक व महानगरपालिका निवडणुकीत शेकडो इच्छुक असतात.
असे असताना ही अशक्यप्राय गोष्ट शक्य झाली. त्याला कारण म्हणजे बँकेतील राजेंद्र भोसले यांचे नेतृत्व होय. मामको बँक पाठोपाठ नाशिक जिल्हा मजूर सहकारी संस्था निवडणुकीत तालुका संचालक म्हणून श्री. भोसले यांची बिनविरोध झालेली निवड त्यांच्या नेतृत्वावर झालेले शिक्कामोर्तब आहे. या निवडणुकींनी मालेगावला सहकारात सहकार्याचा नवा अध्याय सुरु झाला आहे. (MAMCO Bank unopposed election marks new chapter in cooperation in state Nashik Latest Marathi News)
मामको बँक व मजूर संस्था निवडणुकीतून बोध घेऊन आगामी कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी सहकारी संघ यासह विविध सहकारी संस्थांमध्ये हा आदर्श निर्माण झाल्यास रसातळाला जाणाऱ्या सहकारी संस्थांचा निवडणूक खर्चही वाचेल. त्याचवेळी या संस्थांना ऊर्जितावस्था निर्माण होण्यासाठी काही प्रमाणात हातभार लागेल. मामको बँक निवडणूक बिनविरोध झाल्याने बँकेच्या तब्बल ४० लाख रुपये खर्चाची बचत झाली आहे.
पालकमंत्री दादा भुसे, भाजप युवा नेते अद्वय हिरे, सुनील गायकवाड, सुरेश निकम, प्रसाद हिरे या नेत्यांबरोबर ज्येष्ठ संचालक अशोक बैरागी, रवींद्र दशपुते, सतीश कलंत्री आदींनी सहकार्याची भूमिका घेत श्री. भोसले यांच्यावर विश्वास दर्शविला. इच्छुकांमध्ये अंतिम क्षणी माघार घेणाऱ्या देवा पाटील यांचीही भूमिका निर्णायक ठरली. त्यांनी नेत्यांच्या विनंतीला मान दिला. गेल्या दोन दशकापासून बँकेचे नेतृत्व करीत असलेले श्री. भोसले सर्वपक्षीय नेते व मामको बँकेच्या २१ हजाराहून अधिक मतदारांचा विश्वास सार्थ ठरवतील याची खात्री आहे.
हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...
मामको बँक पाठोपाठ नाशिक जिल्हा मजूर संस्था निवडणुकीत तालुका संचालक पदासाठी पॅनलचे नेते श्री. भोसले व शेतकरी सहकारी संघाचे माजी अध्यक्ष युवराज गोलाईत यांच्यात चुरस होती. श्री. गोलाईत हिरे गटाचे समर्थक आहेत. काळाची पावले ओळखून श्री. भोसले यांना श्री. भुसे, श्री. हिरे यांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. श्री. गोलाईत यांनीही सुरवातीला आढेवेढे घेतले. मात्र अखेरच्या टप्प्यात माघार घेतल्याने श्री. भोसले यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुखर झाला. यामुळे जिल्हा पातळीवर मजूर संस्था निवडणुकीत नेतृत्व करण्याची श्री. भोसले यांची संधी कायम आहे.
या दोन निवडणुकांमुळे निवडणूक खर्च वाचतानाच स्थानिक पातळीवरील नेते व कार्यकर्त्यांमधील कटुता काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. सहकार व विकासाच्या कामात हे सामंजस्याचे पर्व कायम राहावे अशी शहर व तालुक्यातील जनतेची अपेक्षा आहे. स्थानिक पातळीवरील नेते कार्यकर्त्यांचे नेतृत्व गुण ओळखून ज्या नेत्याचा ठराविक एकाच क्षेत्रात कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. विकासाची आस आहे. अशा नेत्याला स्थानिक विरोध डावलून संधी मिळाल्यास जिल्हा पातळीवर त्याचे नेतृत्व गुण झळाळून निघतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.