ओझर- कसबे सुकेणे येथे १० महिन्यापुर्वी एकाच्या डोक्यात बियरची बाटली मारून गंभीर दुखापत करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा व तेंव्हा पासून फरार असणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास ओझर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. .ओझर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 30 मे2024 रोजी सायकांळी कसबे सुकेणे गावात फिर्यादी गोकुळ रामकृष्ण सोनवणे रा कसबे सुकेणे हे भगवती मोबाईल दुकानाजवळ उभे असतांना सुकेने गावातील सराईत गुन्हेगार सनी भाऊसाहेब कराटे व त्याचा साथीदार प्रथमेश उर्फ गुड्डु रमेश काळे दोन्ही रा. कसबे सुकेणे यांनी फिर्यादी गोकुळ सोनवणे यास वाईट साईट शिविगाळ करुन आरोपी सनी भाऊसाहेब कराटे याने प्रथमेश उर्फ गुड्डु रमेश काळे यांचे हातातील बिअरची भरलेली बाटली घेवुन फिर्यादी सोनवणेच्या डोक्यात मारुन गंभिर दुखापत करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता फिर्यादी गोकुळ रामकृष्ण सोनवणे रा. मौजे सुकेणे यांनी दिनांक 31मे 2024 रोजी ओझर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन सदर आरोपीतांवर गुरनं 112/2024 भादवि कलम 307,326,324,504,506,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी सनी भाऊसाहेब कराटे हा गुन्हा घडल्यापासुन मागील 10 महिण्यापासुन फरारी होता..दरम्यान आगामी काळात येणा-या कसबे सुकेणे व मौजे सुकेणे येथील यात्रौत्सवाच्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेत नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामिण हरीष खेडकर यांनी दिलेल्या सुचनानुसार परि उप अधीक्षक अद्विता शिंदे प्रभारी अधिकारी ओझर पोलीस स्टेशन यांनी सदर प्रकरणाकडे विशेष लक्ष घातले व सनी भाऊसाहेब कराटे हा आज दिनांक 16 मार्च 2025 रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास कसबे सकेणे गावात त्याचे मित्रांना भेटण्यासाठी येणार आहे. .अशी बातमी त्यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळताच परि उप अधीक्षक अद्विता शिंदे यांनी ओझर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक तुषार गरुड, पोलिस हवालदार दिपक गुंजाळ, जालीदर चौघुले, विश्वनाथ धारबळे. पोलिस नाईक विलास बिडगर, पोलिस शिपाई. राजेद्र डंबाळे, संदिप बोडके यांना घेवुन खाजगी वाहनाने कसबे सुकेणे गावाजवळ जावुन गावातील ग्रामपंचायतीचे पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचुन आरोपीस पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीला पोलीसांची चाहुल लागल्याने त्याने तेथुन पळण्याचा प्रयत्न केला परंतु चारही बाजुनी पोलीसांनी त्याला घेराव घातल्याने 10 महिण्यापासुन फरार असलेला सराईत गुन्हेगार सनी भाऊसाहेब कराटे वय 22 वर्षे रा. कसबे सुकेणे यास ओझर पोलीस स्टेशनकडून अटक करण्यात यश आले. आज रोजी परि उप अधीक्षक अद्विता शिंदे प्रभारी अधिकारी ओझर पोलीस स्टेशन, सपोनि तुषार गरुड, दिपक गुंजाळ, जालीदर चौघुले, विश्वनाथ धारबळे. विलास बिडगर, राजेद्र डंबाळे, संदिप बोडके यांचे पथकाने सदर कारवाई केली.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.