
पोलिस महिलेच्या सजगतेमुळे वाचले एका इसमाचे प्राण
नाशिक : गोदावरी नदीवरील रामवाडी पुलावरून एकाने आत्महत्येच्या उद्देशाने नदीपात्रात उडी घेतली. त्या वेळी साध्या वेशातील पोलिस महिलेने ही घटना पाहिली आणि त्यांनी सजगता दाखवून आरडाओरडा करून नागरिकांनी बोलावले आणि त्यांच्या मदतीने त्या व्यक्तीला बाहेर काढून तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यामुळे सदर व्यक्तीचे प्राण वाचले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामुळे पुन्हा एका पोलिस महिलेच्या कर्तबगारीचे कौतुक होते आहे.
हेही वाचा: पती-सासुच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या
ज्योती भास्कर मोगल, असे या महिला पोलिसाचे नाव आहे. गुरुवारी (ता. १६) सकाळी साडेआठ- पावणेनऊ वाजेच्या सुमारास विनोद छगनशेठ बिरारी (४८, रा. बिरारी निवास, मेरी- दिंडोरी रोड) यांनी अज्ञात कारणातून रामवाडी पुलावरून नदीपात्रात उडी घेतली. या वेळी ज्योती मोगल या तेथून जात होत्या. त्यांनी तत्काळ आजूबाजूला नागरिकांनी आवाज देत बोलाविले आणि पात्रात उडी घेतलेल्या बिरारी यांना बाहेर काढले.
तसेच स्वत: बिरारी यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या तत्परतेमुळे बिरारी यांचे प्राण वाचले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी गंगापूर रोड पोलिस ठाण्याच्या खैरनार या पोलिस महिलेने खुनाच्या घटनेतील एका संशयिताला धाडसाने पकडले होते. तसेच, आजच्या या घटनेमुळे पुन्हा पोलिस महिलेच्या सजगतेमुळे एकाचे प्राण वाचले. त्यांच्या या कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केले.
हेही वाचा: प्रशिक्षणार्थी परिचारिकेची गळफास घेत आत्महत्या
Web Title: Man Life Save Due To Awareness Of Police Woman Godavari River Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..