नाशिक | विंचूर येथे युवकाचा अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Man tried to set himself on fire by pouring kerosene on his body at Vinchur

विंचूर येथे युवकाचा अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न

विंचूर (जि. नाशिक ) : येथे आज सकाळी निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथील भाऊसाहेब सखाहरी साबळे या युवकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत त्याला रोखत लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनुचित प्रकार टळला. डोंगरगाव येथील भाऊसाहेब साबळे याने शेत रस्त्याचा वाद व उपसरपंच राजीनामा देत नाही असे कारणाने आत्मदहणाचा प्रयत्न केल्याची चर्चा नागरिकांमधून होती.

हेही वाचा: नाशिक | दुर्दैवी! दोन सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

loading image
go to top