NSK26H31656
मांडवी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केलेली गांजाची झाडे.
---
मांडवी शिवारात २६२ किलो गांजा जप्त
---
गांजाची शेती उद्ध्वस्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ७ : शेतात लागवड केलेल्या १ कोटी ३१ लाख १५ हजारांची गांजाची झाडे स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केली. याबाबत संशयितावर धडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने धडगाव तालुक्यातील मांडवी शिवारात ही कारवाई केली.
मांडवी (ता. धडगाव) शिवारातील रुणमालपाडा येथे एकाने शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वन पट्ट्यांमध्ये जाऊन पाहणी केली असता, तेथे १ कोटी ३१ लाख १५ हजारांची २६२ किलो गांजाची झाडे मिळून आली. गांजाची झाडे संशयित पिंटू ऊर्फ पिंट्या मिठ्या पटले (रा. मांडवी बुद्रुक, रुणमालपाडा, ता. धडगाव) याने लावली होती. गांजाची झाडे ताब्यात घेतली असून, पिंटू पटले याच्यावर धडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, महेश निकम, हवालदार दिनेश चित्ते, स्वप्नील गोसावी, मुकेश तावडे, सुनील येलवे, सचिन वसावे, अंमलदार मनोज महाजन, अभय राजपूत, निशीगंध गवळे, हेमंत बारी, विनोद पाटील, राहुल पांढारकर यांनी केली.