शहरात दोघींचे सोन्याचे मंगळसूत्र नेले खेचून

शहरात दोघींचे सोन्याचे मंगळसूत्र नेले खेचून
Published on: 
शहरात दोघींचे मंगळसूत्र ओरबाडले सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : सणासुदीत पादचारी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून नेण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. नाशिक रोड परिसरात दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी ओरबाडल्याचा प्रकार घडला असून, याप्रकरणी उपनगर व नाशिक रोड पोलिसात जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चेहडी शिवारातील बोगद्याजवळून निमिता विकास शेजवळ (४३, रा. अक्षर व्हिला, चेहडी) शुक्रवारी (ता. १६) सकाळी दुचाकीवरून घरी जात होत्या. या वेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांपैकी मागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र बळजबरीने खेचून पोबारा केला. हवालदार भामरे तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत पतीसोबत सकाळी वॉक करत असलेल्या ७१ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी हिसकावून नेले. शोभा विनोद नागपुरे (७१, रा. धोंगडेनगर) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (ता. १६) सकाळी पतीसोबत जगताप चौकामागून पायी जात होत्या. स्वरा एंटरप्रायझेससमोर काळ्या रंगाच्या जॅकेट घातलेल्या भामट्याने चालत्या दुचाकीवरून शोभा यांच्या गळ्यातील ११ ग्रॅमचे मंगळसूत्र ओढले व पोबारा केला. सहायक निरीक्षक वायकर तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com