अरुणकुमार भामरे,अंतापूर: महिंद्रा कंपनीचे मालक उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी जागतिक जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे कोणाला न कळता भेट दिली. या प्रवासाचा अनुभव त्यांनी एक्सवर शेअर करताना मांगीतुंगीतील ट्रेकिंग आणि आध्यात्मिक वातावरणाची तुलना ‘केवळ शारीरिक प्रवास नव्हे, तर आत्म्याला स्पर्श करणारा अनुभव’, अशी केली. त्यांच्या या पोस्टमुळे सर्वत्र या क्षेत्राबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.