अंतापूर- बागलाण तालुक्यातील पवित्र मांगीतुंगी श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र आणि १०८ फूट उंच भगवान ऋषभदेव मूर्ती या ठिकाणी पावसामुळे कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून रविवार (ता. ३) पासून पुढील आदेश येईपर्यंत सर्वसामान्य पर्यटकांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. हा निर्णय प्रशासन व मांगीतुंगी ट्रस्ट कमिटीने संयुक्तपणे घेतला असून, फक्त त्यागी संत आणि पुजाऱ्यांनाच पर्वतावर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे