देवळा - या वर्षी अक्षय्यतृतीयेच्या पार्श्वभूमीवर बाजारात थोड्याफार प्रमाणात स्थानिक तसेच कोकण वा परराज्यातील आंब्यावर यंदाची अक्षयतृतीया गोड होणार आहे. सुरुवातीच्या काळात तो काहीसा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर राहील असे चित्र आहे..आंब्यांच्या रसाचा नैवेद्य (आगारी ) पूर्वजांना दाखवून हा सण साजरा केला जातो म्हणून या सणाला आमरस करून सण गोड करण्याची प्रथा आहे. साडे तीन मुहूर्तांपैकी एक अक्षयतृतीया सणाला पुरणपोळी आंब्याचा रस एक महत्वाचा भाग असतो. त्यादिवसापासून पितरांच्या पूजनानंतर अनेक कुटुंबात आंबे खायला सुरुवात करतात..यावर्षी बदाम, लालबाग, केशर, हापूस, दशहरी, राजापुरी, पायरी या व इतर प्रकारचे आंबे बाजारात दाखल झाले आहेत. कोकण, कर्नाटक व इतर राज्यातून येणाऱ्या या आंब्यांना मोठी मागणी असते. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात तसेच इतर भागातही आंब्यांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. तोही आंबा बाजारात दाखल होऊ लागला आहे. वातावरणातील बदलामुळे आणि तापमानात एकदम वाढ झाल्याने मोहोर तसेच लहान आकाराच्या कैऱ्या गळून पडल्या. तर काही भागात बेमोसमी पावसाने दगा दिला. यामुळे आंब्याच्या उत्पादनाला काही अंशी झटका बसला आहे..अक्षयतृतीया सणानिमित्त आंब्याचे किमान १२० ते कमाल २०० रुपये किलो आहेत. अक्षय्यतृतीयेपर्यंत हे भाव आणखी कमी होतील असा अंदाज आहे. गावठी आंबा बाजारात उशिराच येणार आहे.जिल्ह्यातील इतरही असे अनेक शेतकरी आंबा उत्पादनात अग्रेसर आहेत. नाशिक जिल्ह्यात जवळपास तीन हजार ५०० हेक्टर क्षेत्रात आंबा लागवड केली असल्याचे सांगितले जाते..गौराई, झोका कालबाह्यअक्षयतृतीया, गौराई व झोका : येथील ग्रामीण भागात चैत्र पोर्णिमेपासून अक्षयतृतीयेपर्यंत गौराईची स्थापना प्रत्येक घरी केली जात असे. लाकडी शंकर-पार्वती असे गौराईचे रूप असे. त्यावर गुंज, पानाफुलांची पत्री लावून घरातच आकर्षक सजावट मुली व महिलावर्ग करत असे. या दिवसांत घरात, झाडांच्या फांदीनां व इतर सोयीच्या ठिकाणी बांधलेल्या झोक्यावर ''गौर मनीं सई वं- आता कधी येशी वं'' अशी गौराईची गाणी मोठ्या आवडीने गायिली जात. परंतु काळाच्या ओघात व मोबाईलच्या जमान्यात आता गौराई, गौराईची गाणी व झोका पहायला मिळत नाही..बाजारात दाखल होणारा आंबा हा नैसर्गिक पद्धतीने पिकला आहे की रसायनांच्या मदतीने पिकवला आहे याकडे ग्राहकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. रसायनांच्या मदतीने पिकवलेला आंबा हा चहुबाजूने पिवळा दिसतो. यामुळे त्याची मूळ चव बदलून तो आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक व हानीकारक ठरू शकतो. - गंगाधर पगार, खडकओझर, ता. चांदवड.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.