नाशिक- मंत्रिपद मिळाल्यापासून वादात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा थेट विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’वरून शेअर केला आहे. त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. याविषयी स्पष्टीकरण देताना मंत्री कोकाटे म्हणाले, की मी वरिष्ठ सभागृहात बसलो होतो. त्या वेळी कनिष्ठ सभागृहात काय चाललंय हे पाहण्यासाठी यू-ट्यूब सुरू करत होतो. मात्र, मोबाईल सुरू करताच रमीची जाहिरात आली, ती जाहिरात स्कीप करताना दोन-तीन सेकंद लागले. तुम्हाला तशी जंगली रमीची जाहिरात येत नाही का, असा उलट सवालही कोकाटे यांनी विरोधकांना केला.