नाशिक- मोबाईलवर रमी खेळतानाच्या व्हिडिओ प्रकरणी अडचणीत सापडलेले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. ‘राजीनामा देण्यासारखे काय घडले,’ असा सवाल करत त्यांनी सभागृहात व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीचा ‘सीडीआर’ तपासण्याची मागणी केली. चौकशीत दोषी आढळलो तर स्वत:हून राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करेन, अशी भूमिका मंत्री कोकाटे यांनी मंगळवारी स्पष्ट केली.