NCP Stages Protest in Nashik Against Agriculture Minister Manikrao Kokate : आंदोलनकर्त्यांनी कोकाटे यांच्या छायाचित्रावर पत्ते उधळत आणि ‘जोडे मारो’ आंदोलन करीत निषेध नोंदविला. रमी मास्टर कृषिमंत्री असा कोकाटेंचा उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदावरून त्यांची हक्कालपट्टी करावी, अशी मागणी केली
नाशिक- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मंगळवारी (ता. २२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी कोकाटे यांच्या छायाचित्रावर पत्ते उधळत आणि ‘जोडे मारो’ आंदोलन करीत निषेध नोंदविला.