नाशिक- वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत राहिलेले कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद धोक्यात सापडले आहे. विरोधकांचा वाढता दबाव आणि सततच्या वक्तव्यामुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याने पक्षाकडून ही कारवाई होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जातो. दरम्यान, त्यांनी बुधवारचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केल्याने कार्यकर्त्यांची चलबिचल झाली. अनेक कार्यकर्त्यांनी दिवसभरात त्यांच्या नाशिकच्या निवासस्थानी भेट देत खात्री करण्याचा प्रयत्न केला.