Nashik News: ‘तीळगूळ सांडू नका, नायलाॅन मांजा वापरू नका’; ‘वैनतेय’च्या चिमुकल्यांची मांजामुक्तीची शपथ

नायलाॅन मांज्याने परिसरातील पक्षी व माणसांवर मकरसंक्रांतीपूर्वीच संक्रांत आणली आहे, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
Students of Vainteya Primary Vidyamandir taking the Manjamukti Oath.
Students of Vainteya Primary Vidyamandir taking the Manjamukti Oath.esakal

निफाड : मकरसंक्रांतीचे वेध लागल्याने पतंगप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले आहे. बालगोपालांपासून वृद्धांमध्येही दुसऱ्याचा पतंग कापण्यासाठी नायलाॅन मांज्याच्या वापराची चढाओढ दिसून येते.

याच नायलाॅन मांज्याने परिसरातील पक्षी व माणसांवर मकरसंक्रांतीपूर्वीच संक्रांत आणली आहे, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. (Manjamukti oath of Vaintey school students at niphad Nashik News)

नायलाॅन मांज्यावर बंदी असूनही त्याचा होणारा वापर पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. त्यावर उपाय म्हणून वैनतेय प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी नायलॉनचा मांजा वापरणारच नाही, अशी शपथ घेतली.

शिक्षक गोरख सानप यांनी नायलॉन मांजामुळे होणारे दुष्परिणाम, तसेच मांज्याच्या वापरामुळे येवला, सिन्नर, नाशिक येथे घडलेल्या अपघातांच्या वृत्तपत्रातील बातम्यांचे कात्रण दाखवून विद्यार्थ्यांना नायलाॅन मांजा वापरापासून परावृत्त केले.

नायलाॅन मांजा वापरल्यास चार महिने ते एक वर्ष शिक्षेची तरतूद असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी ‘मांजा हटवा, पक्षी वाचवा’, ‘तीळगूळ वाटा, मांजाला टाटा’, ‘आमचा तीळगूळ सांडू नका, नायलाॅन मांजा वापरू नका’, ‘खाऊ तीळ आणि गुळाची पोळी, नायलाॅन मांजाची करू होळी’, ‘आज एकच संकल्प करा, नायलाॅन मांजा हद्दपार करा’, अशा घोषणा देऊन जनजागृती केली.

तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर येथील पक्षी अभयारण्यात देशी-विदेशी पक्षांचे आगमन सुरू आहे. नायलाॅन मांजामुळे अभयारण्यातील चिमणी, कबूतर, पोपट, कावळे, साळुंकी, मैना, घार, शराटी, घुबड, करकोचा, फ्लेमिंगो, पाणकोंबडी, अशा विविध पक्षांना धोका निर्माण झाला आहे.

मांजामुक्तीची शपथ घेऊन पक्षीसंवर्धनासाठी चिमुकल्यांनी राबविलेला हा उपक्रम मांजाबंदीच्या चळवळीतील खारीचा वाटा असला, तरी समाजाला प्रेरणा देणारा ठरणार आहे.

Students of Vainteya Primary Vidyamandir taking the Manjamukti Oath.
Chhatrapati Sambhajinagar : मांजा विक्री करणाऱ्या सात दुकानांवर कारवाई

पक्षीरक्षणार्थ चिमुकल्यांनी राबविलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे न्यायमूर्ती रानडे विद्याप्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष वि. दा. व्यवहारे, सचिव रतन वडघुले, संस्थापक विश्वस्त ॲड. ल. जि. उगावकर, राजेंद्र राठी, किरण कापसे, राजेश सोनी, ॲड. दिलीप वाघावकर, विश्वास कराड, मधुकर राऊत, नरेंद्र नांदे, प्रभाकर कुयटे, गटशिक्षणाधिकारी एल. के भरसट, विस्ताराधिकारी कैलास बोरसे, केंद्रप्रमुख नीलेश शिंदे, मुख्याध्यापिका सुजाता तनपुरे, शिक्षक, पालक व पक्षीप्रेमींनी कौतुक केले.

"धारदार सुरीप्रमाणे माणसाचा गळा, अवयव आणि पक्ष्यांचे पंख छाटणारा नायलाॅन मांजा केवळ जीवघेणाच नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. वर्षानुवर्षे टिकून राहणारा नायलाॅन मांजा सडतही नाही आणि कधीही नष्ट होत नाही. ‘वैनतेय’च्या चिमुकल्यांनी मांजामुक्तीची शपथ घेऊन राबविलेला उपक्रम समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे."

-वि. दा. व्यवहारे, कार्यकारी अध्यक्ष, न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळ, निफाड

Students of Vainteya Primary Vidyamandir taking the Manjamukti Oath.
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का घालतात? यामागचं रंजक कारण जाणून घ्या
मंगळवारी आढळलेली जखमी जंगल मैना.
मंगळवारी आढळलेली जखमी जंगल मैना.esakal

निफाडला जंगल मैना जखमी

कोळवाडी रोडवर मंगळवारी (ता. ९) सायकलीवरून परत येत असताना, डॉ. उत्तमराव डेर्ले यांना एक पक्षी जखमी अवस्थेत पडलेला दिसला. ती जंगल मैना होती. पायांना गंभीर जखम असल्याने तिला पायावर उभे राहता येत नव्हते.

त्यांच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार करून देखभालीसाठी वन उद्यानात वनपाल भगवान जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांकडे तिला सुपूर्द केले. सध्या मकरसंक्रांत असल्याने पतंगोत्सव जोमात सुरू झाला आहे.

नायलॉन मांजा बेकायदेशीर वापरला जात आहे. तो पशु-पक्षी व मनुष्याला गंभीर जखमी करीत आहे. कधी कधी तो प्राणघातक ठरत आहे. जागरुक नागरिकांनी त्याचा वापर करू नये. कुटुंबातील इतरांना करू देऊ नये, असे आवाहन डॉ. डेर्ले यांनी केले आहे.

Students of Vainteya Primary Vidyamandir taking the Manjamukti Oath.
Nashik BJP News: भाजप प्रवेश करणाऱ्यांना ‘नो कमिटमेंट’! देवळाली विधानसभेवरून गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com