मनमाड- काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे रखडलेले मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रशासनिक निर्णय, विकासकामे आणि कर्मचाऱ्यांचे पगार यांसारखे महत्त्वाचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. भाजपचे बाजार समिती सभापती दीपक गोगड यांनी मुख्यमंत्री देवेंदर फडणवीस यांची भेट घेऊन प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले.