मनमाड- शहरातील मालेगाव नाका परिसरातील सिकंदर नगर भागात शुक्रवारी सायंकाळी एका अल्पवयीन ५ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न उधळून लावण्यात आला. सतर्क नागरिकांनी वेळेवर हस्तक्षेप करत आरोपीला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.