मनमाड- मनमाड शहरात एमडी ड्रग्स, पांढरी पावडर (कोकेन/हेरॉईन) आणि कुत्ता गोळी (नशेची प्रतिबंधित गोळी) यांसारख्या अत्यंत धोकादायक अंमली पदार्थांचा शिरकाव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही गंभीर बाब असून मनमाड पोलीस प्रशासनाने याबाबत सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.