मनमाड- मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी साडे आठच्या सुमारास एका अज्ञात तरुणाने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने फलाट क्रमांक चारवरील पादचारी पुलाच्या बाहेरील बाजूस चढून बसल्याने स्टेशन परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. पुलाजवळच हाय व्होल्टेज ओव्हरहेड वायर असल्याने अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला होता.