Manohar Ahire : ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेतील जवान मनोहर अहिरे यांना वीरमरण; मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Final Goodbye: Rai Mourns the Loss of Heroic Soldier Manohar Ahire : भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले जवान मनोहर अहिरे यांना त्यांच्या मूळ गावी आराई येथे लष्करी इतमामात मानवंदना देऊन अखेरचा निरोप देण्यात आला.
आराई: भारतीय सैन्य दलातील आराई (ता. बागलाण) येथील मनोहर आहिरे ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेत कर्तव्य बजावत असताना प्रतिकूल हवामानामुळे आजारी पडले. त्यांना तातडीने पुणे येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांनी प्राणज्योत मालवली.