Nashik: कारडा कन्स्ट्रक्शनचे मनोहर कारडा यांची धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या; फसवणूकप्रकरणी होता गुन्हा दाखल

Manohar Karda
Manohar Kardaesakal

Nashik News : कारडा कन्स्ट्रक्शनचे संचालक मनाेहर कारडा यांनी गुरुवारी (ता.२) दुपारी धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. दोन दिवसांपूर्वीच आर्थिक फसवणूकप्रकरणी अटक करण्यात आलेले नरेश कारडा यांचे मनोहर कारडा हे भाऊ होते.

दरम्यान, फसवणुकीच्या गुन्ह्यात मनोहर कारडा यांना न्यायालयाने आजच अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. परंतु ते समजण्यापूर्वीच त्यांनी आत्महत्त्या केल्याचे समजते. (Manohar Karda of Karda Construction commits suicide by jumping in front of moving train case registered for fraud Nashik)

मुंबई नाका पोलिसात कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा, मनाेहर कारडा, देवेश कारडा व संदीप शहा यांच्याविरोधात १ कोटी २० लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा गेल्या सोमवारी (ता.३०) दाखल झाला होता.

तसेच, शहर आर्थिक गुन्हेशाखेने नरेश कारडा यांना अटक केली होती. तर, मनोहर कारडा व देवेश कारडा यांनी अटकपूर्व जामीनासाठी नाशिक न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या अटकपूर्व जामीनावर गुरुवारी (ता.२) सुनावणी होती.

त्यात त्यांना अटी-शर्थींसह अटकपूर्व जामीन मंजूर मिळत दिलासाही मिळाला होता. परंतु तत्पूर्वीच मनोहर कारडा यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संसरी गेट परिसरात धावत्या मालगाडीसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्त्या केली.

घटनेची माहिती मिळताच देवळाली कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Manohar Karda
Nanded Crime : अधीक्षक अभियंत्यासह लिपिक लाच घेताना ताब्यात

या घटनेची माहिती कळताच कारडा यांचे नातेवाईक, बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक व क्रेडाईच्या सदस्यांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.

तक्रारींची ओघ सुरूच

कारडा कन्स्ट्रक्शनच्या संचालकांनी गुंतवणूकदारांकडून पैसे घेत त्यांना सदनिका, गाळ्यांचा ताबा न देणे, बांधकाम न करणे, बनावट कागदपत्रे तयार करून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत.

आर्थिक गुन्हे शाखेने तपास केला असता कारडा यांनी अनेकांना आर्थिक गंडा घातल्याचे समोर आले आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये सदनिका, गाळे विक्री करण्याच्या मोबदल्यात कारडा कन्स्ट्रक्शनने गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये घेतले.

मात्र बांधकाम प्रकल्प पुर्ण न करता गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यासही टाळाटाळ केली. याप्रकरणी दिवसेंदिवस आर्थिक गुन्हेशाखेकडे तक्रारी वाढत आहेत.

Manohar Karda
Jalgaon Crime: भुसावळला 3 वाळूची वाहने ताब्यात; वाळूमाफियांविरोधात ‘महसूल’ची धडक कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com