धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H32509
धुळे : मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी स्वाक्षरी मोहीमेचा प्रारंभ करतांना मनसेचे पदाधिकारी.
---
‘सीईसीं’च्या राजीनाम्यासह
बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या
---
मनसेतर्फे धुळ्यात स्वाक्षरी मोहीम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ : निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, मतदार याद्यांतील स्पष्टता, एसआयआर प्रक्रिया रद्द करणे, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा, आगामी सर्व निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सोमवारी (ता. १२) महात्मा गांधी पुतळ्याजवळ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, स्वच्छ व पारदर्शक मतदार याद्या तयार कराव्यात आणि सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशा प्रमुख मागण्यांसाठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. पक्षातर्फे राज्यभरात अशाच प्रकारची मोहीम सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या मोहिमेत नागरीकांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी मनसेचे राज्य उपाध्यक्ष रावसाहेब कदम, उत्तर महाराष्ट्र महिला सचिव प्राची कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख, जिल्हा सचिव अजितसिंह राजपूत, संदीप जडे, धुळे तालुकाध्यक्ष संतोष मिस्तरी, शहर सचिव अनिल शिरसाठ, गोराणेचे उपसरपंच नंदू पाटील, रस्ते आस्थापना जिल्हा संघटक राजेश दुसाने, रस्ते आस्थापना जिल्हा सचिव दीपक बच्छाव, धुळे तालुका उपाध्यक्ष रामकृष्ण वाघ, प्रथमेश कासार आदी उपस्थित होते.
---