नाशिक- दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) तर्फे घेतलेल्या सीए फाउंडेशन आणि सीए इंटरमिजिएट परिक्षेचा निकाल मंगळवारी(ता. ४) सकाळी जाहीर झाला. ही परीक्षा मार्चमध्ये घेतली होती. इंटरमिजिएटमध्ये मानसी चौधरी हिने ४६४ गुणांसह नाशिकमध्ये अव्वल क्रमांक पटकावताना राष्ट्रीय क्रमवारीत ३३ वे स्थान राखले.