बेहेड येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शन

बेहेड येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शन
Published on: 
बेहेड महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शन म्हसदी,ता. १० : बेहेड (ता. साक्री) येथील श्री.छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त मराठी पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले. प्राचार्य व्ही. आर. बोदडे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी मराठी विषय शिक्षिका श्रीमती पी. एस. देवरे यांनी अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करत वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. माय मराठीच्या समृद्धीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी वाचन संस्कृती जोपासण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रदर्शनात पाचशे पेक्षा अधिक ग्रंथ मांडण्यात आले होते. विविध प्रसिद्ध लेखकांच्या साहित्यकृतीसह काही प्राचीन ग्रंथ ही प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. शिवपूर्वकालीन लिखित तसेच शिवकालीन आज्ञापत्रे विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरली. विविध मराठी कवींचा परिचय करून देण्यात आला. शिक्षकांनी लेखक व त्यांच्या साहित्यकृतीची माहिती दिली.यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी काव्यवाचन केले. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध ग्रंथांची माहिती जाणून घेतली वाचनाची आवड निर्माण करण्यासोबतच मराठी भाषा व साहित्याच्या समृद्ध परंपरेची ओळख करून देणारे हे प्रदर्शन ठरले. सूर्यकांत काकुस्ते यांनी सूत्रसंचालन केले. एन.एस. शहा यांनी आभार मानले. श्री. छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालिका माहेश्वरी सचिनराव देसले, आर. एम. गवित, कनिष्ठ लिपिक आर. सी. तोरवणे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com