Simon Martin : "आपण अघोषित आणीबाणीत जगत आहोत"; ख्रिस्ती साहित्य संमेलनात सायमन मार्टिन यांचा सरकारवर प्रहार
Simon Martin Flags ‘Undeclared Emergency’ in Present Times : लक्षात घ्या, की येशूच्या तत्त्वज्ञानात समतेचा जागर करण्यात आलेला आहे. परंतु, सध्या समता नावाच्या मूल्याची परवड होत असल्याचे परखड विचार ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन यांनी मांडले.
नाशिक: आपण सर्व सध्या अघोषित आणीबाणीचा अनुभव घेत आहोत. व्यक्त झाल्यावर अंध भक्तांच्या टोळ्या तुटून पडतात. आंदोलन केल्यावर तुमच्या रस्त्यात खिळे ठोकले जातात. सर्व बाजूंनी कोंडी करून पाळत ठेवली जात आहे.