drama competition
sakal
नाशिक: स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संघाच्या मागणीनुसार ५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेत चौदा वर्षांखालील मुलांना प्रवेश दिला जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात लहान मुलांना प्रवेशबंदीसाठी नाट्यगृहाबाहेर ‘नो एंट्री’चा फलक लावण्यात येणार असून, नाममात्र दरात मिळणाऱ्या तिकिटावरही तसा उल्लेख करण्यात येणार आहे.