नाशिक- वन विभागातील मराठी आयएफएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खुद्द वनमंत्री गणेश नाईक यांनी या प्रकरणाची दखल घेत तातडीने नियुक्त्या करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे येत्या आठवड्याभरात मराठी अधिकाऱ्यांची नियुक्ती होण्याची चिन्हे आहेत.