नाशिक: देशात हिंदीचे प्राबल्य वाढविण्यासाठी देशाची राष्ट्रभाषा हिंदी असावी ही संघाची विचारसरणी होती. गोळवलकर गुरुजींनी हिंदी आणि संस्कृत भाषा राष्ट्रभाषा असावी, असे म्हटले आहे. खऱ्या अर्थाने भारताची राष्ट्रभाषा संस्कृत व्हायला हवी; पण आज संस्कृत कुणी बोलत नाही म्हणून त्याला तडजोड हिंदी भाषा स्वीकारावी, त्यासाठी राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्याचा मथितार्थ आहे. मराठी भाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करावी. इतर राज्यांच्या धर्तीवर मराठी भाषा विकास प्राधिकरण व्हावे, असे प्रतिपादन राजभाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.