नाशिक- नाशिकच्या ओझर विमानतळावरून मार्च महिन्यात सर्वाधिक प्रवाशांनी विमान प्रवास केल्याची नोंद झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ५४.२ टक्के एवढी वाढ प्रवाशांमध्ये झाली. यात सर्वाधिक प्रतिसाद नाशिक- दिल्ली व नाशिक- अहमदाबाद सेवेला मिळाला आहे. कोविड काळात नाशिकच्या ओझर विमानतळावर वर्षभरात १८ हजार प्रवाशांची नोंद झाली होती.