विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Published on: 
छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या पतीसह चौघांविरुद्ध भद्रकालीत गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. १५ : सासरकडून सातत्याने होणारी शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. १४) घडली. विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिसांनी पती, दोन दीर आणि जाऊ अशा चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. जरीना सिराजोद्दीन शेख (२८) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह १२ फेब्रुवारी २०२० रोजी सिराजोद्दीन अलीमुद्दीन शेख याच्याशी झाला होता. विवाहावेळी माहेरच्यांनी २० ग्रॅम सोन्याचे दागिने दिले होते. तसेच लग्नासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च केला होता. सुरुवातीस वर्षभर संसार सुरळीत सुरू होता. मात्र, त्यानंतर सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू करण्यात आला. पतीकडून वारंवार शिवीगाळ आणि मारहाण केली जात होती. तसेच मोठा दीर फजलुद्दीन दबाव टाकून धाक दाखवत होता. दुसरा दीर सरफोद्दीन आणि जाऊ रेहाना किरकोळ कारणांवरून टोमणे मारून शिवीगाळ, मारहाण करीत असल्याचे जरीनाने माहेरच्याना सांगितले होते. पतीला भडकवून मारहाण करण्यास प्रवृत्त केले जात होते. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सासरच्या छळाला कंटाळून जरीनाने आत्महत्येची भीती व्यक्त केली होती. त्यामुळे माहेराच्यानी नाशिक येथे येऊन सासरच्यांची समजूत काढली होती. त्यानंतर तिला पुन्हा सासरी पाठविण्यात आले. मात्र, तिचा छळ थांबला नसल्याचे ती फोनवरून माहेरच्या नातेवाइकांना सांगत होती. ---चौकट फोन करून दिली माहिती शनिवारी दुपारी पतीने जरीनाच्या वडिलांना फोन करून तिने गळफास घेतल्याची माहिती दिली. माहिती मिळताच माहेरचे नातेवाईक नाशिकला दाखल झाले. जरीनाला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर रविवारी (ता. १५) भाऊ अब्रार मन्नान सय्यद याने पती सिराजोद्दीन अलीमुद्दीन शेख, दीर फजलुद्दीन अलीमुद्दीन शेख, दीर सरफोद्दीन अलीमुद्दीन शेख आणि जाऊ रेहाना फजलुद्दीन शेख (सर्व रा. मुलतानपुरा, जुने नाशिक) यांनी जरीनाचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.